+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

कुंभ

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात आपल्याला बदल करावे लागतील. दूरचे प्रवास घडून येतील. आनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील.उधारी उसनवारी वसूल होईल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल.व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल.  दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुस:यावर सोपवू नका. 
शुभदिनांक 18,19
 

मासिक भविष्य

शैक्षणिक क्षेत्रत परदेशातील संस्थांशी संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. एखाद्या श क्रियेला सामोरे जावे लागेल.  व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. जोडीदाराच्या बढती-बदलीचे योग येतील. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. जोडधंद्यातून भरपूर काम मिळेल. नवीन करार होतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील. आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रय} करेल. प्रवासात आपले खिसापाकिट, महत्वाचे दस्तऐवज सांभाळा. तीव्र इच्छाशक्ती  व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणो मात कराल. राजकीय, सामाजिक कार्यकत्र्याना चांगल्या संधी लाभतील. जनसंपर्कातून लाभ होतील. उत्तरार्धात खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची व ालंकांरांची खरेदी कराल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल.
 

प्रमोटेड बातम्या