+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

मिथुन

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

कोणतेही निर्णय घेताना अतिशय विचार करण्याची गरज आहे. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींच्या ओळखीतून कामात नुकसान संभवते. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील.  सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. कुटुंबात आपल्या  मतांचा आदर केला जाईल. वाहन-वास्तूचे योग येतील. आपले ध्येय साध्य करता येईल. आध्यत्मिक ओढा वाढेल. 
शुभदिनांक 18,19
 

मासिक भविष्य

धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रत प्रगती होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. परंतू आपली मते इतरांवर लादू नका. महिलांची विवाहकार्यातील मध्यस्थी योग्य व निर्णायक ठरणार आहे. संततीसंबंधी चिंता दूर होतील. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहूल लागेल. विद्याथ्र्यी वर्गाला स्पर्धापरीक्षांतून चांगले यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. हौसे मौजेखातर खर्च कराल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. इच्छापूर्ती होईल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे.  आर्थिक आवक चांगली राहणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून फायदा होईल. जूनी येणी वसुल होतील. नवनवीन उपक्रम राबविले जातील. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या सहकार्यानें महत्वाची कामे पार पाडाल. लेखक, साहित्यिक यांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणाला पुरस्कार मिळतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. विद्याथ्र्याना स्पर्धापरीक्षांतून यश लाभेल. कामाचा व्याप वाढवाल. सतत कामात मग्न राहाल. आपली विलासीवृत्ती वाढेल. 
 

प्रमोटेड बातम्या