+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

धनु

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

होणा-या चंद्रभ्रमणामुळे आपली आर्थिक बाजू बळकट करणा-या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कुटुंबात सुसंवाद  साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. मोठ्या उत्साहाने आपली कामे कराल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील,  एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणो सोपे जाईल. गुंतवणुकीतून लाभ होतील.
 शुभदिनांक 20,21
 

मासिक भविष्य

उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांपासून त्रस होण्याची शक्यता राहाते. विरोधकांचा त्रस जाणवेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. महत्वाचे दस्तऐवज हाती लागतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नशिबाची साथ लाभेल. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. आत्मविश्वास वाढवणा:या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. नव्या जोमाने कामाला लागाल. बौद्धीक व कला क्षेत्रतून चांगला फायदा होईल. व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. सरकारी परवाने मिळतील. लेखक, साहित्यिक, पत्रकार, प्रकाशक यांना आपापल्या क्षेत्रत चांगल्या संधी लाभतील. खेळाडूंनी अवाजवी साहस टाळावे.
 

प्रमोटेड बातम्या