+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

वृश्चिक

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सहलीचे आयोजन केले जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील. मह्त्वाच्या विषयांवर भावंडांशी सुसंवाद साधून त्यांचा सल्ला ग्राह्य मानाल. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. जोडदंद्यातून लाभ होतील. आपल्या कार्यक्षेत्रतून प्रशिक्षणासाठी निव़ड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. संततीच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणो पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे.  जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.
शुभदिनांक 18,19
 

मासिक भविष्य

आपल्या कतृत्वाला चांगला उजाळा मिळेल. आपली मते ठाम राहतील. महत्वाची जबाबदारी स्वीकाराल. सरकारी नोकरीत कार्यरत असणा:या व्यक्तींना  सरकारी वाहन-वास्तूचे योग येतील. शांत संयमाने विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घ्याल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फायदा होईल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. गुढविद्येकडे आपला ओढा वाढेल. तसेच सूचक स्वप्ने पडतील. स्वप्नरंजनात गढून जाल. घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रत प्रगती साधाल.  थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. काही अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागेल. संततीसंबंधी चिंता जाणवेल. महत्त्वाच्या निर्णयातील आपला पुढाकार कुटुंबियांना आधार देणारा राहील. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील. नवीन नोकरीच्या शोधात असणा:या तरुणांना सुसंधी. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. दशम व लाभस्थानातून  होणारे व्यावसायिक करारातून फायदा देणारे राहील. रेंगाळलेल्या सरकारी कामांतून यशप्राप्ती मिळेल. आपल्या हाताखालच्या व्यक्तींना चुचकारुन त्यांच्याकडून काम करुन घ्यावे. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जाल. 
 

प्रमोटेड बातम्या