+
लाइव न्यूज़
  • 04:53 PM

    उत्तर प्रदेश: सीतापूरजवळ मालगाडीचं इंजिन घसरल्याचं वृत्त.

  • 04:48 PM

    मुंबई : हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रेपर्यंतच लोकल सेवा

  • 04:42 PM

    नार्को अॅनलिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात डीआयजी स्वाती साठे आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर झाल्या.

  • 04:41 PM

    मुंबई - पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 मिनीटांनी उशीरानं सुरु

  • 04:34 PM

    फिफा अंडर 17 वर्ल्ड कप: जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमजवळील दुकानं 25 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश.

  • 04:32 PM

    यवतमाळ - दारव्हा शहरात एका रात्रीत तीन घरफोडी एका ठिकाणी अयशस्वी प्रयत्न, ४२ हजार २०० रुपये व मोबाईल लंपास.

  • 04:30 PM

    डोंबिवली- पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आभाळ पूर्ण भरलेले आहे. संततधार सुरू असून सध्या तरी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

  • 03:58 PM

    अहमदनगर : शहरातील उड्डाणपूलासह शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते विकास महामंडळाकडून १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा.

  • 03:45 PM

    ठाणे : खंडणी प्रकरणात ठाणे न्यायालयाने इकबाल कासकरला सुनावली 8 दिवसांची पोलीस कोठडी.

  • 03:41 PM

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे झालेल्या एस.टी. बस व दोन रिक्षांच्या अपघातात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू, रिक्षातून बाहेर फेकली गेलेली ही बालिका छोट्या ओढ्यात पडली होती.

  • 03:27 PM

    औरंगाबाद - महापालिका सर्वसाधारण सभेत एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी वंदे मातरम सुरु असताना सभागृह सोडले.

  • 03:14 PM

    कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडले.

  • 03:12 PM

    लातूर - शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर अखिल महाराष्ट्र जनरल कामगारांचे जेलभरो आंदोलन.

  • 03:11 PM

    औरंगाबाद - अर्ध्यातासात झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय, पुंडलिक नगर, न्यायनगर, जयभवनीनगर, हुसैन कॉलनीवरील रस्त्यावर पाणी साचून दुकानात पाणी शिरले.

  • 02:57 PM

    शिर्डी- रेल्वे स्टेशन व नगर-मनमाड महामार्गाच्या दरम्यान आढळले दोन व्यक्तीचे मृतदेह.. नगर-मनमाड महामार्गापासून स्टेशन वर जाण्याच्या मार्गावर अवघे दोनशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाजवळ सापडले मृतदेह

All post in लाइव न्यूज़

वृषभ

आज

१९ सप्टेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

होणारे चंद्राचे भ्रमण आपला उत्कर्ष करणारे राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. दूरचे प्रवास घडून  येतील. तरुणांना नोकरीत सुसंधी लाभतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.  नोकरीतही अनपेक्षित चांगला बदल झाल्याने समाधान लाभेल. अधिकारावर असणा-या व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. अनावश्यक खर्च उद्भवतील. आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. सार्वजनिक कामात यश मिळेल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.  
शुभदिनांक 23

मासिक भविष्य

भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. आपणांस कुटुंबातील वडिलधा:या व्यक्तीचा आधार वाटेल. प्रतिष्ठीत बडय़ा व्यक्तीचे घराला पाय लागतील.  घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात आनंददायक गोष्टी घडतील. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. वाहन, वास्तूचे आपले स्वप्न साकार होण्याची चिन्हे दिसू लागतील. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. स्पर्धा परीक्षांतून तसेच शैक्षणिक क्षेत्रतून विद्याथ्र्याना यश लाभेल. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. जनसंपर्कातून लाभ होतील. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. जून्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. व्यवसाय-उद्योगातील हाताखालच्या सहकार्य लाभेल. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. पूर्वनियोजित कामे पार पडतील. उत्तरार्धात  नवीन व्यावसायिक करार होतील. वकील, प्रकाशक, लेखक, साहित्यिक, कलाकार यांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल.
 

प्रमोटेड बातम्या