+
लाइव न्यूज़
 • 10:17 AM

  बीड : चंदू गायकवाड (30) या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या. पाटोद्यातील ऊखंडा गावातील घटना.

 • 09:48 AM

  कल्याण : एपीएमसी मार्केट दरम्यान वाहनांची रांग झाली कमी. पण वाहतूक पूर्वपदावर यायला लागणार आणखी थोडा वेळ.

 • 09:18 AM

  डोंबिवली : शीळ-कल्याण महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या लांब रांगा.

 • 08:13 AM

  ठाणे : वासिंद भागात भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू, शास्त्री कॉलनी परिसरातील बुधवारी (23 ऑगस्ट )दुपारची घटना, फिरायला गेलेल्या 7-8 जणांपैकी दोघांचा मृत्यू.

 • 07:54 AM

  श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मध्यरात्री २.२८ वाजता ५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का. जिवीतहानी झाली नसल्याची माहिती.

 • 07:29 AM

  रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर, आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून जिओ फोनचं प्री- बुकींग सुरू.

 • 07:12 AM

  नवी दिल्ली - 'राइट टू प्रायव्हसी'बाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे.

 • 06:47 AM

  मुंबई - विक्रोळी लिंकरोडवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची पाच कार आणि दुचाकीला धडक, यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते.

 • 05:37 AM

  जम्मू-काश्मीरमध्ये रात्री अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 5.0 इतकी मोजण्यात आली.

 • 03:56 AM

  गेल्या आठ महिन्यात स्वाइन फ्लूने भारतात 1094 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.

 • 03:28 AM

  दहशतवाद्यांच्या धमकीनंतर रॉटरडॅममधील डच शहरात होणारा रॉक कॉन्सर्च रद्द करण्यात आला.

 • 03:00 AM

  नवी दिल्ली : २०० रुपयांच्या दर्शनी मूल्याची नोट चलनात आणण्यास रिझर्व्ह बँकेस अधिकार देणारी अधिसूचना केंद्र सरकारने बुधवारी जारी केली असून, अशी नोट लवकरच चलनात येईल, हे आता नक्की झाले आहे.

 • 01:39 AM

  कॅनडा : क्युबेकमधील पॅने-देस-कॅसकेड पार्कमध्ये असलेले स्वस्तिक चिन्ह हटविण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिला. बुधवारी चिन्ह काळ्या पेंटने मिटविण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले.

 • 11:43 PM

  अमरावती : अमरावती रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या मातेविरुद्ध बडनेरा रेल्वे पोलिसांनी मुलीच्या मृत्यू प्रकरणी व स्वत: मरण्यास प्रवृत्त झाल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला.

 • 11:21 PM

  'राइट टू प्रायव्हसी'बाबत सर्वोच्च न्यायालयाचा उद्या येणार मोठा निर्णय आणखी वाचा...

All post in लाइव न्यूज़