वैद्यकीय (डॉक्टर) मुंबई
डॉ. अमित मायदेव, गॅस्ट्रॉलॉजी, मुंबई
गेली २७ वर्षे डॉ.अमित मायदेव व्हिडीओ एन्डोस्कोपीच्या तंत्राने शस्त्रक्रिया करत आहेत. देशातील पहिले एन्डोस्कोपी सेंटर स्थापन करण्याचे श्रेय डॉ. अमित मायदेव यांना जाते. मुंबईच्या भाटिया रुग्णालयात १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रियेचे केंद्र सुरू केले. रुग्णाच्या शरीरावर कमीत कमी छेद करून दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाऊ शकते हे डॉ. अमित मायदेव यांनी दाखवून दिले.२०११ मध्ये त्यांना वर्ल्ड कप आॅफ एन्डोस्कोपीमध्ये तिसºया क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देशातील पहिली ‘एन्डोस्कोपी आॅन व्हिल्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन २०१९ साली करण्यात आले. या फिरत्या व्हॅनमुळे गरीब, गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार मिळणार आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये ओरल एन्डोस्कोपिस्ट मायोटॉमी ज्याला वैद्यकीय भाषेत ‘पोएम’ म्हणतात या शस्त्रक्रियेचा प्रयोग झाला. या शस्त्रक्रियेने ‘अक्लेझिया कार्डिया’ म्हणजेच एखाद्या व्यक्तीला गिळण्याचा त्रास होत असेल तर त्यावर उपचार केला जातो. भारतातील रुग्णांना या शस्त्रक्रियेचा फायदा मिळावा यासाठी डॉ. मायदेव यांनी ही शस्त्रक्रिया शिकून २०१२ साली भारतात सुरू केली. डॉ. मायदेव यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने लठ्ठपणावर केली जाणारी ‘स्लिव्ह गॅस्ट्रोप्लास्टी’ ही शस्त्रक्रिया ब्राझिलचे डॉ. मॅनोएल नेटो यांच्याकडून शिकून घेतली. अर्ध्या तासात अॅसिडिटीच्या त्रासावर मात करणारी ‘अॅन्टी रिफ्रेक्स म्युकोसेक्टॉमी’ ही शस्त्रक्रियाही त्यांनी आत्मसात केली. ते देशातील २०० पोटविकारतज्ज्ञ, सर्जन आणि फिजिशिअन्सचे ‘एन्डोस्कोपी’चे गुरू आहेत.
डॉ. भरत दळवी, कार्डियॉलॉजिस्ट, मुंबई
डॉ. भरत दळवी हे सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील बालहृदयरोग विभागात सल्लागार तज्ज्ञ आहेत. इकोकार्डिओग्राफिक इमेजिंग आणि एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए डिव्हाइस क्लोजर यांसारख्या नॉनसर्जिकल कार्डियॅक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांची शंभरहून अधिक संशोधने प्रकाशित आहेत. जन्मजात हृदयाच्या समस्येवर शस्त्रक्रिया न करता हृदयाचे छिद्र्र बंद करण्याच्या वैद्यकीय प्रक्रियेचे ते प्रणेता आहे. अरुंद झडपांचे विघटन करणे, अरुंद रक्तवाहिन्या विस्तृत करणे आणि स्टेंट करणे, तसेच नवजात मुलांमध्ये जटिल कॅथेटर आधारित हस्तक्षेप समाविष्ट आहे.
फुप्फुसीय धमनीमध्ये स्टेंट रोपण करणे, हृदयाचे छिद्र बंद करणे, नवजात मुलांमध्ये बंद झडप छिद्र करणे, पौगंडावस्थेतील आणि प्रौढांमधील पर्क्युटेनियस वॉल्व्ह रोपण करणे या कामात त्यांचे देशात मोठे योगदान आहे. तसेच, त्यांनी पीडियॅट्रिकसोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांनी रुग्णसेवेव्यतिरिक्त ३० वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यापन आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये लक्षणीय वेळ घालवला आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सुमारे दीडशेहून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि २००हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांना अमेरिका, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, तैवान, जपान, व्हिएतनाम, तुर्की, इराण, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील १००हून अधिक आंतरराष्ट्रीय बैठकींसाठी प्राध्यापक म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. बालरोग आणि प्रौढांच्या स्ट्रक्चरल हृदयाच्या दोषांशी संबंधित सर्व राष्ट्रीय बैठकींमध्ये ते आमंत्रित असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये त्यांनी अनेक लाइव्ह कार्यशाळा घेतल्या आहेत, ज्यायोगे कार्डियॅक हस्तक्षेप करण्याच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले आहे.
डॉ. बी. के. ऊर्फ बसंत कुमार मिश्रा, न्यूरोसर्जन, मुंबई
भारतातील वैद्यकक्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया डॉ. बी. सी. रॉय नॅशनल अॅवॉर्डने डॉ. बसंत कुमार मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. बसंत कुमार मिश्रा, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये सर्जरी विभागाचे प्रमुख तसेच न्यूरोसर्जरी आणि गॅमा नाइफ रेडिओ सर्जरीप्रमुख आहेत. अमेरिकन अॅकॅडेमी आॅफ न्यूरॉलॉजिकल सर्जरी या जागतिक दर्जाच्या न्यूरोसर्जन असोसिएशनचे भारतातील दुसरे सदस्य होण्याचा मान मिश्रा यांना प्राप्त आहे. २०१५ मध्ये न्यू यॉर्कच्या जो ली मॅगझिनने जगातील सर्वोत्कृष्ट १६ न्यूरोसर्जन्समध्ये त्यांचा समावेश केला. सर्जरीच्या क्षेत्रातील एन्यूरिजम सर्जरी, की होल स्पाइन सर्जरी, अवेक क्रेनिओटॉमी, गॅमा नाइफ रेडिओसर्जरीसारख्या अनेक सर्जरीज प्रथम केल्याचा मान त्यांना प्राप्त आहे. २८ ते २९ एप्रिल दरम्यान बॉस्टन येथे होणाºया अमेरिकन असोसिएशन आॅफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्सचा इंटरनॅशनल लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिश्रा यांना प्राप्त झाला असून, त्यांच्या पुरस्कार यादीत आणखी एकाची भर पडली आहे. एमबीबीएसमध्ये ३ सुवर्णपदकांचे मानकरी असलेले मिश्रा यांनी युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे रजिस्टार म्हणून ही भूमिका पार पाडली आहे. देशांत आणि परदेशांत अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून भेटी दिल्या आहेत. यामध्ये बॉस्टन येथील हार्वर्ड मेडिकल स्कूल, जपानमधील हिमेजी हार्ट अँड ब्रेन हॉस्पिटल, अमेरिकेतील टेक्सास टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे.
डॉ. रेखा डावर, गायनेकॉलॉजिस्ट, मुंबई
प्रोफेसर एमरट्स, ग्रँट मेडिकल कॉलेज, जे.जे. हॉस्पिटल, मुंबई. त्यांनी आयसीएमआर (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. कुटुंब नियोजनाच्या नवीन सुरक्षित पद्धतीवर त्यांनी रिसर्च केला व इंजेक्शन, इन्प्लान्ट, फिमेल कंडोम या गोष्टी आज त्यांच्यामुळे उपलब्ध झाल्या आहेत. मागील ४१ वर्षांपासून स्त्रीआरोग्याच्या सेवेसाठी डॉ. रेखा डावर कार्यरत आहेत. १९७९ साली औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सहायक प्राध्यापिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाºया डॉ. रेखा डावर यांनी प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीआरोग्यातील वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. मुंबईच्या जे. जे. रुग्णालय व ग्रँट गव्हर्टमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आणि प्रसूतीशास्त्र-स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख म्हणून २० वर्षे काम पाहिल्यानंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या. आपल्या तब्ब्ल ३८ वर्षांच्या शासकीय सेवेच्या कालावधीत डॉ. डावर यांनी सार्वजनिक रुग्णालयांतील महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण, शहरी रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पाडल्या. तसेच अनेक एमबीबीएस , नर्सिंग, एमडी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या या कार्यात खंड पडू दिला नाही. अमेरिकेत अभ्यास करून तेथील ग्रीनकार्ड प्राप्त करूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग भारतातील व महाराष्ट्रातील रुग्णांच्या सेवेसाठी केला. त्यासाठी त्यांनी खासगी पर्याय न निवडता शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सेवेचा पर्याय निवडला. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनसोबतचे त्यांचे आईकडून मुलाकडे हस्तांतरित होणाºया एचआयव्हीवरील काम हे अग्रगण्य ठरले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.
डॉ. विनय देशमाने, कॅन्सर सर्जन, मुंबई
डॉ. विनय देशमाने हे प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीचे या संघटनेचे मानद सचिव आहेत. गेली अनेक वर्ष कर्करोग शस्त्रक्रिया व कर्करोग संशोधन या शाखांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. फेब्रुवारी २००१ मध्ये डॉ. देशमाने यांनी लंडन येथील विद्यापीठातून एम.डी ही पदवी मिळविली. तर १९८३ मध्ये जे.जे. महाविद्यलायातून त्यांनी एम.बी.बी.एसचे शिक्षण घेतले आहे. गेली २५ हून अधिक वर्ष ते वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या मुंबईतील पी.डी.हिंदुजा व शुश्रूषा रुग्णालयात ते कार्यरत आहेत.
डॉ. देशमाने हे देशातील निपल डक्ट एंडोस्कोपी (ब्रेस्ट एंडोस्कोपी) च्या प्रक्रियेचे प्रणेते आहेत. यामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या उपचार प्रक्रियेत ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. यात स्तनाग्रांद्वारे थेट स्तनांच्या नलिकामध्ये एक लहान एन्डोस्कोपचा समावेश करतात. त्या माध्यमातून स्तनांच्या नलिकापर्यंत थेट व्हिज्युअलायझेशन आणि प्रवेश मिळू शकतो. हिंदुजा रुग्णालयात गेली दोन वर्ष या माध्यमातून उपचार केले जातात. १९८७ मध्ये मास्टर आॅफ सर्जरी एक्झामिनेशन या परीक्षेत डॉ. देशमाने यांनी मुंबई विद्यापाठातून तृतीय क्रमांक पटकाविला. १९९४ फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे पार पडलेल्या बायनियल नॅशनल कॅन्सर काँग्रेस आॅफ द इंडियन सोसायटी आॅफ आॅन्कोलॉजी परिषदेत त्यांना उत्तम संशोधन प्रबंधासाठी ‘यंग सायंटिस्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मनीचे प्राध्यापक डब्ल्यू. स्टेनिअर यांच्या मार्गदर्शनाखील इंटरनॅशनल कॅन्सर शिष्यवृत्ती त्यांनी मिळविली. या शिष्यवृत्ती अंतर्गत ‘कार्बनडायआॅक्साइड लेझर इन लेरिनगिअल अँड हायपोपनिर्गिअल ट्यूमर’ या विषयावर अभ्यास करण्यात आला. लंडन येथील इम्पिरिअल कॅन्सर रिसर्च फंडचीही क्लिनिकल रिसर्च फेलोशिप, ब्रेस्ट कॅन्सर कॅम्पेन फेलोशिप डॉ. देशमाने यांना मिळाली. २००१ मध्ये ह्यफेलो आॅफ द इंटरनॅशनल कॉलेज आॅफ सर्जन्सह्ण हा किताब मिळविला. आशिया व पॅसिफिक फेडरेशन व इंटरनॅशनल कॉलेज आॅफ सर्जन्स यांच्या संयुक्तपणे आयोजित परिषदेत डॉ. देशमाने यांनी सादर केलेल्या थायरॉइड विषयावरील संशोधन पेपर सर्वोत्तम ठरला.