रंगभूमी
Theatre
चंद्रकांत कुलकर्णी, मुंबई (वाडा चिरेबंदी),
विजुगिषीवृत्तीने रंगभूमीवर आश्वासक पाऊल ठेवत यशाचे उत्तुंग शिखर गाठत ‘जिगिषा’हे नाव साथर ठरविणारा एक विलक्षण रंगकर्मी म्हणजेच चंद्रकांत कुलकर्णी ! दिग्दर्शन, अभिनय, पटकथालेखन अशा क्षेत्नातील आघाडीचे नाव. मूळचे मराठवाड्याचे असलेले चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या नाट्यक्षेत्नाची मुहूर्तमेढ औरंगाबाद येथे रोवली. तिथे एकांकिका, हौशी व समांतर रंगभूमी त्यांनी गाजवली. जिगीषा हा नाट्यवेड्यांचा चमू त्यांनी निर्माण केला आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध नाट्याविष्कार घडवले. नाटककार महेश एलकुंचवार यांच्या वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी व युगांत या त्रिनाट्यधारेचे दिग्दर्शन करून ते व्यावसायिक रंगभूमीवर मुख्य धारेत आले. त्यानंतर त्यांची आगेकूच जोरात सुरु झाली. ‘ध्यानीमनी’ हे त्यांनी दिग्दिर्शत केलेले नाटक रंगभूमीवर नावाजले गेले. गांधी विरु द्ध गांधी या नाटकाचे दिग्दर्शन करून त्यांनी वेगळा बाज जोपासला. चाहूल , डॉक्टर तुम्हीसुद्धा , चारचौघी , मौनराग, आधी बसू मग बोलू यांसह नव्याने रंगभूमीवर आलेले हमिदाबाईची कोठी , बटाट्याची चाळ , शांतता, कोर्ट चालू आहे अशी जवळपास 65 नाटके त्यांनी दिग्दिर्शत केली.
नाट्यक्षेत्नात यशस्वी घोडदौड करत असतानाच त्यांना चित्रपटाचे माध्यमही खुणावत होते. अमोल पालेकर यांच्या बनगरवाडी या चित्रपटात त्यांनी चक्क भूमिका साकारली. त्यानंतर मराठी चित्नपटाचा बाज बदलून टाकणारा बिनधास्त हा चित्रपट दिग्दिर्शत करून त्यांनी येथेही त्यांचा दबदबा निर्माण केला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भेट, कायद्याचं बोला, कदाचित, तुकाराम, आजचा दिवस माझा, दुसरी गोष्ट अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. दूरचित्रवाणीवरील पिंपळपान ही त्यांची मालिका गाजली.
तेजश्री प्रधान (कार्टी काळजात घुसली),
‘होणार सून मी या घरची’ या दूरचित्रवाणी मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान! रसिकांच्या मनात खोलवर ठाण मांडले. तेजश्रीची ही ‘जान्हवी’ इतकी लोकप्रिय झाली की तिला जान्हवी म्हणूनच ओळखले जाऊ लागले. तिच्या अभिनायाचे प्रचंड गारुड जनमानसावर झाले आणि तेजश्री रसिकांच्या गळ्यातली ताईत बनली. आज जान्हवीचे नक्की काय होणार, अशा चर्चा रोजच्या रोज घराघरांत महिला प्रेक्षकांच्या कोंडाळ्यात घडू लागल्या. या मालिकेने तेजश्रीला लोकप्रियता मिळवून दिली असली, तरी तिने तिच्या अभिनयाचा श्रीगणोश त्याआधीच केला होता. झेंडा, शर्यत अशा चित्नपटांतून दिसलेली तेजश्री प्रधान ‘ लग्न पाहावे करून’ या चित्नपटातल्या ‘आनंदी’ च्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आली.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तिच्या नवर्याची भूमिका रंगवणा-या अभिनेता शशांक केतकर याच्याशी तिने रिअल लाईफ मध्येही विवाह केला. त्यामुळे तिची रील लाईफ स्टोरी प्रत्यक्षातही जशीच्या तशी उतरली. अभिनेता प्रशांत दामले यांच्यासह अलीकडे ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकात काम करून तिने रंगभूमीवर पाऊल टाकले. छोट्या पडद्यावरची जान्हवीची लोकप्रियता तिला नाटकातल्या या भूमिकेसाठी कामी आली आणि तिने रिसकांना या नाटकाकडे खेचून घेतले.
पुष्कर श्रोत्री (हसवा फसवी),
मराठी आणि हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणो वाजवणारा असा कलावंत की ज्याच्या विनोदी बाजाच्या भूमिकांसाठी विशेष करून ओळखला जातो, तो म्हणजे पुष्कर श्रोत्री! चित्रपटांसोबत नाटकातही त्याने दमदार मजल मारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी हसवाफसवी या नाटकात साकारलेल्या 6 विविधांगी भूमिकांचे शिवधनुष्य पुष्करने टेचात उचलले आणि हम भी कुछ कम नही याची प्रचीती आणून दिली.
अलीकडेच रेगे या चित्रपटात त्याने धडाकेबाज पोलिस अधिकार्याची भूमिका दणक्यात रंगवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्नपटांत पुष्कर यशस्वी ठरला. एक डाव धोबीपछाड , जबरदस्त , हापूस , ङोंडा , मोरया , रीटा , हिप हिप हुर्ये , बदाम राणी गुलाम चोर , गोळाबेरीज या व अशा अनेक मराठी चित्नपटांत पुष्करने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली. अ पेईंग घोस्ट या चित्रपटात त्याने हटके अवतार धारण केला आणि लगोलग आलेल्या ‘ कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातून त्याने लाजवाब भूमिका साकारत त्याची ताकद दाखवून दिली. लगे रहो मुन्नाभाई , मुन्नाभाई एमबीबीएस असे हिंदी चित्नपटही त्याच्या नावावर आहेत.
मुक्ता बर्वे (छापा काटा),
मराठी मनोरंजन क्षेत्रात आपल्या अमूल्य योगदानाने अमीट ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे! अनेक मालिका, नाटके आणि चित्रपट त्यांनी त्यांच्या विविध भूमिकांद्वारे गाजवले आहेत. अभ्यासू आणि अतिशय हुशार अभिनेत्री म्हणून त्यांची या क्षेत्रात ओळख आहे.
घडलंय बिघडलंय या मालिकेतून झळकलेल्या मुक्ता बर्वे यांनी आम्हाला वेगळं व्हायचंय या नाटकातून रंगभूमीवर पाऊल टाकले आणि त्यानंतर चकवा या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. थांग , माती माय , सुंबरान , एक डाव धोबीपछाड , शेवरी असे चित्रपट करत असतानाच त्यांच्या ओंजळीत जोगवा हा चित्रपट आला आणि त्यातल्या सुलीने रिसकांना वेड लावले. या त्यांच्या भूमिकेने त्यांच्या कारिकर्दीला खरे वळण मिळाले.
पण केवळ जोगवा च्या यशात त्या अडकून पडल्या नाहीत; तर त्यानंतर त्यांनी आघात , बदाम राणी गुलाम चोर असे चित्रपट केले. पण त्यांच्या कारिकर्दीत अजून एक महत्त्वाचे वळण आले आणि ते म्हणजे मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट ! उत्कट प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटाने मुक्ता बर्वे यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
गोळाबेरीज , लग्न पाहावे करून , मंगलाष्टक वन्स मोअर , हाय वे , मुंबई पुणे मुंबई २ यांच्यासह अलीकडेच आलेला डबलसीट या चित्रपटांतल्या भूमिकांमुळे त्यांच्या कारकीर्दीचा आलेख सदैव चढता राहिला. मराठी रंगभूमीवरील मुक्ता बर्वे हा एक वेगळाच विषय आहे. फायनल ड्राफ्ट या नाटकात अफलातून भूमिका रंगवणार्या मुक्ता बर्वे यांनी विविध कंगोरे असलेल्या भूमिकांचा सडा रंगभूमीवर पाडला. देहभान , कबड्डी कबड्डी , छापा काटा , लव्हबर्ड्स या नाटकांतल्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर गारुड केले. रंगभूमीवर केवळ अभिनय करूनच त्या थांबल्या नाहीत; तर काव्य, संगीत आणि अभिनयाचे मिश्रण असलेला रंग नवा हा आगळा प्रयोग त्यांनी रंगभूमीवर साकारला.
दूरचित्रवाणीवरील मालिकांतून रंगवलेल्या भूमिकांमुळे त्या घराघरांत जाऊन पोहोचल्या. पिंपळपान , बंधन , चित्तचोर , श्रीयुत गंगाधर टिपरे , आभाळमाया अशा अनेक मालिका त्यांनी केल्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट ही त्यांनी गाजवली आणि यातली त्यांची राधा रसिकांच्या मनात थेट उतरली.
प्रशांत दामले (कार्टी काळजात घुसली)
मराठीतील एक हरहुन्नरी कलावंत म्हणून असलेली ओळख. एकाच दिवशी पाच आणि एकाच नाटकाचे हजारहून अधिक प्रयोग करून विश्वविक्रम करणारे नाव म्हणजे प्रशांत दामले! टूरटूर या नाटकाने प्रशांत दामले हा नट मराठी रंगभूमीला दिला आणि तेव्हापासून हा नट सातत्याने पायाला भिंगरी लावल्याप्रमाणो नाटकांशी खेळ खेळत आहे. आजच्या घडीला नाट्यप्रयोगांच्या दृष्टीने मराठी रंगभूमीवरचा विक्र मादित्य म्हणून प्रशांत दामले यांचे नाव घेतले जाते. विनोदी बाजाच्या भूमिका हे त्यांचे बलस्थान आहे. हसवणूक करणा:या, खेळकर पठडीतल्या भूमिका ही त्यांची मक्तेदारी आहे. गोड चेह:यात असणारा मिश्किल भाव आणि रंगभूमीचे अवकाश लीलया कवेत घेण्याचे त्यांचे धाडस याने प्रशांत दामले यांनी त्यांचे नाणे रंगभूमीवर खणखणीत वाजवले. नाटक, चित्नपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्नात संचार करणा:या प्रशांत दामले म्हणजे उत्साहाचा धबधबा आहे. या क्षेत्नातील 32 वर्षांच्या काळात 27 नाटके, 37 चित्रपट आणि 24 मालिका, अशी बहुमोल कामिगरी त्यांच्या नावावर आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कारांचे ते धनी झाले आहेत चार वेळा लिम्का रेकॉंर्ड मध्ये त्यांचे नाव दिमाखात झळकले आहे.
नाटकांचे अकरा हजारांहून अधिक प्रयोग रंगवलेले प्रशांत दामले यांच्यात असलेली ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. हजरजबाबीपणा, समयसूचकता, अफलातून टायमिंग ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. मोरूची मावशी या नाटकाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या ओघात सुयोग या सुधीर भट यांच्या नाट्यसंस्थेशी त्यांचा योग जुळून आला आणि प्रशांत दामले व सुयोग हे अतूट असे समीकरण बनले. ब्रम्हचारी , लग्नाची बेडी , प्रीतीसंगम , पाहुणा , प्रियतमा , लेकुरे उदंड झाली , गेला माधव कुणीकडे , चार दिवस प्रेमाचे , एका लग्नाची गोष्ट , जादू तेरी नजर , बहुरूपी , नकळत दिसले सारे या व अशा एकाहून एक सरस नाटकांत प्रशांत दामले यांनी त्यांच्या अभिनयाचे रंगदर्शन घडवले. अलीकडे त्यांनी मराठी नाटकातून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर करून ते हिंदी मालिकेच्या वळचणीला गेले होते. मात्र तिथून पुन्हा ते स्वगृही, म्हणजे मराठी नाटकाकडे आता वळले असून, ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक सध्या ते करत आहेत. यात हिरो नव्हे तर चक्क वडिलांची भूमिका त्यांनी साकारली आहे. त्यांच्या कारिकर्दीतला हा टर्निग पॉंइन्ट समजला जातो.
नाटकांसोबत त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप चित्नपटांतूनही पाडली. सवत माझी लाडकी , सारेच सज्जन , चार दिवस सासूचे , धुमाकूळ , बंडलबाज , आत्मविश्वास , पसंत आहे मुलगी , विधिलिखित , एक रात्न मंतरलेली अशा चित्नपटांपासून गोळाबेरीज , वेलकम जिंदगी अशा चित्रपटांपर्यंत त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. भिकाजीराव करोडपती , आमच्यासारखे आम्हीच अशा मालिकांतूनही त्यांनी काम केले. आम्ही सारे खवय्ये हा त्यांचा टीव्ही शो विशेष लोकिप्रय झाला.